Demo6
COMBINE
राज्यघटना
1
संविधान निर्मिती प्रक्रिया
1. खालील व्यक्तींपैकी कोण कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते? (Group C (P) 2024)
2. सर स्टॅफोर्ड क्रिप्स: हे व्यापार मंडळाचे अध्यक्ष होते. (1942 क्रिप्स मिशनचे सुद्धा प्रमुख होते).
3. ए. व्ही. अलेक्झांडर: हे फर्स्ट लॉर्ड ऑफ एडमिरल्टी होते.
2. 'मुन्शी-अय्यंगार सूत्र' कशाशी संबंधित आहे? (Group B (P) 2024)
कॅबिनेट मिशन (त्रिमंत्री योजना)
ब्रिटिश सरकारने 1946 मध्ये भारताला सत्ता हस्तांतरित करण्यासाठी व भारताच्या संविधान निर्मितीसाठी संविधान सभा स्थापन करण्याकरिता 'कॅबिनेट मिशन' (Cabinet Mission) भारतात पाठवले होते. यामध्ये तीन ब्रिटिश सदस्य होते. सर विलियम वुड (Sir William Wood) हे कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते.
कॅबिनेट मिशनचे सदस्य
1. लॉर्ड पेथिक-लॉरेंस: हे भारताचे राज्य सचिव (Secretary of State for India) होते आणि कॅबिनेट मिशनचे प्रमुख होते.2. सर स्टॅफोर्ड क्रिप्स: हे व्यापार मंडळाचे अध्यक्ष होते. (1942 क्रिप्स मिशनचे सुद्धा प्रमुख होते).
3. ए. व्ही. अलेक्झांडर: हे फर्स्ट लॉर्ड ऑफ एडमिरल्टी होते.
'मुन्शी-अय्यंगार सूत्र' हे भाषा समस्या (Official Language Issue) शी संबंधित आहे.
भारतीय संविधान सभेमध्ये (Constituent Assembly) भारताची अधिकृत भाषा (Official Language) कोणती असावी, यावर खूप वादविवाद झाले.
हिंदीला राष्ट्रभाषा बनवण्याबाबत काही सदस्यांचा आग्रह होता, तर बिगर-हिंदी भाषिक राज्यांकडून, विशेषतः दक्षिण भारतातील राज्यांकडून तीव्र विरोध होता.
या भाषिक समस्येवर तोडगा काढण्यासाठी आणि एक सहमती घडवून आणण्यासाठी कन्हैयालाल माणिकलाल मुन्शी (K.M. Munshi) आणि एन. गोपाळस्वामी अय्यंगार (N. Gopalaswami Ayyangar) यांनी एक सूत्र (formula) मांडले. हेच 'मुन्शी-अय्यंगार सूत्र' म्हणून ओळखले जाते.
या सूत्रानुसार
हिंदी (देवनागरी लिपीतील) ही भारतीय संघराज्याची अधिकृत भाषा (Official Language of the Union) असेल, (राष्ट्रभाषा (National Language) नाही).
इंग्रजीचा वापर अधिकृत कार्यांसाठी पुढील 15 वर्षांसाठी (1965 पर्यंत) चालू राहील अशी तरतूद करण्यात आली.
राज्यांना त्यांच्या स्वतःच्या अधिकृत भाषा निवडण्याची परवानगी देण्यात आली.
यामुळे भारतीय संविधानाच्या कलम 343 ते 351 (भाग 17) मध्ये अधिकृत भाषांशी संबंधित तरतुदी समाविष्ट करण्यात आल्या. या सूत्राने भाषिक एकोपा राखण्यास मदत केली गेली.
राज्यघटना
COMBINE
3. भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते?
(Combine Gr. B & C (P) 2023)
ग.वा. मावळणकर
संविधान सभेच्या कार्यावरील समितीचे अध्यक्ष
डॉ.बी.आर. आंबेडकर
मसुदा समितीचे अध्यक्ष
तसेच पुढील समितीचे सदस्य -
➲ सल्लागार समिती
➲ मूलभूत हक्क उपसमिती
➲ अल्पसंख्यांक उपसमिती
➲ संघराज्य घटना समिती
राजेंद्र प्रसाद
पुढील समित्यांचे अध्यक्ष
➲ कार्यपद्धती नियम समिती
➲ सुकाणू समिती
➲ स्टाफ व वित्त समिती
➲ ध्वज/फ्लॅग समिती
4. संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा ................ मध्ये तयार केला.
(Combine Gr. B & C (P) 2023)
राज्यघटनेचा पहिला मसूदा
विशिष्ट विषयासंबंधी कार्यकारी समित्यांनी चर्चा वादविवादाद्वारे अहवाल तयार केले ज्यात अनेकवेळा बदल करावे लागले. घटनेचे सल्लागार सर बेनेगल नरसिंह राव यांनी या अहवालाच्या आधारे ऑक्टोबर 1947 मध्ये घटनेचा पहिला मसूदा तयार केला.
डॉ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखालील मसूदा समितीने ऑक्टोबर 1947 ते फेब्रुवारी 1948 या काळात सर बी.एन. राव यांनी केलेल्या मसुद्याची दैनंदिन बैठकांद्वारे सखोल तपासणी करून स्वयं एक मसूदा तयार केला.
सर बी.एन. राव यांनी जो संविधानाचा पहिला मसूदा बनवला होता, त्यात 242 कलमांचा समावेश होता. संविधान समितीकडे हा मसूदा गेल्यावर त्यातील या कलमांची संख्या वाढवून 315 करण्यात आली. त्यानंतर पुढे तब्बल 2473 बदल सुचवण्यात येऊन 395 कलमांसह भारतीय संविधान तयार झाले.
5. भारताची संविधानसभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली?
Gr. C (P) 2022
ऑगस्ट ऑफर 1940
पार्श्वभूमी : 1939 च्या उत्तरार्धात दुसरे महायुद्ध सुरू झाले. ब्रिटीशांनी भारतीयांशी सल्ला मसलत न करता भारताला युद्धात ओढले.
Comments
Post a Comment